Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Caseनाशिकच्या कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.

प्राथमिक तपासात पीडित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला संपूर्ण तपास गोपनीय ठेवला होता. दरम्यान, हा प्रकार आश्रमशाळेच्या परिसरात घडलेला नसून, संबंधित विद्यार्थिनी सुट्टीनिमित्त आपल्या गावी गेली असताना ही घटना घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती दिली असून, दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमित आरोग्य तपासणी होत असतानाही इतकी गंभीर बाब वेळेत लक्षात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case

ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत? ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Kalvan Adivasi School Minor Girl POCSO Case : नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *