Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajanपंचवटीतील धोकादायक वाड्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.

Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajan

नाशिक | MHDU News

नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचवटी परिसरातील अनेक जुने व धोकादायक वाडे धोक्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. काही ठिकाणी इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटनांनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी पंचवटीतील धोकादायक वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे आणि अखंड सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या वास्तूंवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह शनी मंदिर परिसर, सरदार चौक आणि पंचवटीतील संवेदनशील वाड्यांची पाहणी केली.

यावेळी अधिकाऱ्यांकडून इमारतींची सद्यस्थिती, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि आवश्यक स्थलांतराबाबत माहिती घेण्यात आली.

पाहणीदरम्यान बेळे यांच्या जीर्ण दुमजली वाड्याची स्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. इमारतीचा सांगाडा कमकुवत झाल्याने कोणतीही दुर्घटना घडू शकते, असे निरीक्षण नोंदवत मंत्री महाजन यांनी तेथील रहिवासी व व्यावसायिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन केले.

यावेळी धोकादायक इमारतींची नियमित तपासणी, आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना, परिसर सुरक्षित करणे आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. नागरिकांनीही जीर्ण व धोकादायक इमारतींपासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग तिपटीने वाढला; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Dangerous Wadas Inspection by Girish Mahajan :पडक्या वाड्यांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांचे आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *