Shirpur NIMS College Student Suicide – शिरपूर निम्स कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्याशिरपूर निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याची आत्महत्या – धुळे बातमी

धुळे, शिरपूरशिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.डी.के.एम. Shirpur NIMS College मध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) असे आहे. अथर्व हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याने Shirpur NIMS College परिसरातील एका वसतिगृहात गळफास घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारच्या मध्यरात्री घडल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती समजताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, या घटनेमुळे कॉलेज परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अथर्वच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, त्याचे पालक शिरपूर येथे दाखल झाले आहेत. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून सुरू आहे.

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed