Rahul Dhikale Nashik BJP Election Charge
नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली असून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक शहराची धुरा आता ‘पूर्व’चे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी नाशिक उत्तर व दक्षिण अशा दोन विभागात वाटणी करण्यात आली असून अनुक्रमे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि गिरीश पालवे यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेची धुरा दादा जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भाजपने यावेळी “शंभर प्लस”चे लक्ष्य ठेवत संघटनात्मक पातळीवर मजबूत यंत्रणा उभी करण्याचा निर्धार केला आहे. नाशिकमध्ये पुन्हा सत्ता स्थापण्यासाठी ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे शहराच्या निवडणुकीचे नेतृत्व सोपवले आहे. ढिकले हे दोन वेळा आमदार, नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यांचा स्थानिक अनुभव आणि संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)
सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजनही त्यांच्या मतदारसंघात होणार असल्याने हा काळ नाशिककरांसाठी अत्यंत निर्णायक आहे. जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची “निवडणूक प्रभारी” म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या आणि ॲड. ढिकले यांच्या नेतृत्वात नाशिक महानगरपालिका निवडणुका लढवल्या जाणार आहेत.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मंत्री संजय सावकारे ‘निवडणूक प्रभारी’ असतील. जळगाव शहराची जबाबदारी राजू (मामा) भोळे, जळगाव पूर्व (रावेर) नंदू महाजन, आणि जळगाव पश्चिम आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)
नंदुरबारची जबाबदारी पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून काम पाहतील. धुळे शहरात अनुप अग्रवाल तर ग्रामीण भागाची जबाबदारी कुणाल पाटील यांच्याकडे आहे, आणि मंत्री जयकुमार रावल प्रभारी म्हणून कार्यरत राहतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने “शंभर प्लस”चे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे.
भाजपने विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा निर्धार केला असल्याचे ॲड. राहुल ढिकले यांनी सांगितले. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)

mhdunews #mhdusocial #Nashik #NashikPolitics #RahulDhikale #BJPNashik #NashikElection #NashikMahanagarPalika #MaharashtraPolitics #GirishMahajan #DevendraFadnavis #PoliticalUpdate #MHDUnewsExclusive


[…] […]
Jilipark app is the way to go! So convenient and easy to use. Gotta love playing on the go. Get the jilipark app now!
888winbr, heard some good stuff about it. Planning to check it out myself soon. Something for you too: 888winbr
My buddy told me about 07casinoapp last week and I have been using it everyday! I like the options. I bet you would, too! Check it out: 07casinoapp
Alright, 257bet5, you’re on! Gave it a whirl and it’s not bad, pretty standard fare but the bonuses were alright. Could use a bit of a refresh but hey, it does the job. Check out 257bet5 if you’re looking for something simple.
Tresreyescasino… Three Kings Casino? Okay, I’m intrigued. Navigation’s smooth and they seem to have some decent jackpots going. A solid option for a casual night in. Give tresreyescasino a try, you might get lucky!
Been seeing a lot about khelo24match360 lately. Anyone have a referral code they want to share? Or just some general advice? Sign up or check information from khelo24match360
Alright rummy fans, has anyone tried goldsrummy? Thinking about giving it a go, but want to make sure it’s not a scam first! Play rummy at goldsrummy
Just heard about my777yono! Sounds intriguing. Has anyone had any wins? I’m always trying to find a new and enjoyable pastime. Discover more at my777yono