Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana First List 2026
मुंबई | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील सात जिल्ह्यांतील ५५३ पात्र शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात समावेश करण्यात आला असून, त्यांच्या २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांच्या कर्जाची माफी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एकूण ४० हजार ९८० कोटी रुपयांची ऐतिहासिक तरतूद केली आहे. त्यामध्ये नव्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपये, तर यापूर्वीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांसाठी ४ हजार ३९५ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
या १२ लाख शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे.
पहिल्या यादीतील जिल्हानिहाय लाभार्थी (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana First List 2026)
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – ५८ शेतकरी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – १३३ शेतकरी
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – १६ शेतकरी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – ८५ शेतकरी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – ३८ शेतकरी
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – १८२ शेतकरी
एकूण लाभार्थी – ५५३ शेतकरी
राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. लाभार्थी निवड, यादी प्रसिद्ध करणे आणि लाभ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे शासनाने सांगितले आहे. (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana First List 2026)
ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या उत्साहाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता कर्जमाफी झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देणे बँकांसाठी बंधनकारक करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana First List 2026

