Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles
नाशिक शहरात वाहनांच्या काचांवर नियमबाह्य काळी फिल्म लावून वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अवघ्या ३५ दिवसांत तब्बल ९६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून ७ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या नियमबाह्य काळ्या फिल्म काढून टाकण्यात आल्या. वाहनांच्या काचांवर अशा प्रकारची फिल्म असल्यास वाहनाच्या आतील भागाची दृश्यमानता कमी होते. परिणामी वाहनचालकाला आजूबाजूच्या वाहतुकीचा तसेच रस्त्यावरील परिस्थितीचा योग्य अंदाज घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य ब्लॅक फिल्मचा वापर धोकादायक ठरू शकतो. संभाव्य अपघातांना आळा घालण्यासोबतच वाहनचालक, पादचारी आणि अन्य रस्ते वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले. _ Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles
वाहनचालकांनी आपल्या वाहनांच्या काचांवर नियमबाह्य काळी फिल्म किंवा प्रतिबंधित साहित्याचा वापर करू नये, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Traffic Department Action Against Black Film Vehicles


The login process is super quick and everything just works. I appreciate how straightforward the layout is. Give 22funlogin a try!