Jalgaon Cyber Awareness Impact Program
जळगाव : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावातील ब्राह्मण सभागृह येथे नागरिकांसाठी विशेष सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध क्लृप्त्या आणि पद्धती समजावून सांगितल्या. ऑनलाइन व्यवहार करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, अनोळखी लिंक किंवा संदेशांपासून कसे सावध राहावे, तसेच फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. _ Jalgaon Cyber Awareness Impact Program
कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांच्या सहकार्याने हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी Quick Heal Foundation च्या Anti Fraud App चीही नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच उपस्थितांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून देत ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षणासाठी उपयुक्त साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी केवळ तक्रार नोंदविण्यापेक्षा नागरिकांमध्ये आधीपासूनच डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशाने झालेला हा उपक्रम नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरला.
-Jalgaon Cyber Awareness Impact Program

