Nashik Kumbh 2027 Infrastructure Planसिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 13,840 कोटींच्या पायाभूत सुविधा विकास आराखड्याला गती.

Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात वाहतूक आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी तब्बल 13,840 कोटी रुपयांचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 1,436 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम, रुंदीकरण आणि अपग्रेडेशन करण्याचे नियोजन आहे.

कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून मोठ्या संख्येने भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासोबतच प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळांना परस्परांशी जोडण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे. _ Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan

या महत्त्वाकांक्षी नियोजनात नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी आणि शनिशिंगणापूर यांना जोडणाऱ्या धार्मिक पर्यटन सर्किटचा विकास करण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि ओझर विमानतळ यांची रस्ते जोडणी अधिक सक्षम करून भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास सुलभ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे सुमारे 66.6 किलोमीटर लांबीचा रिंग रोड, ज्यासाठी अंदाजे 3,954 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. शहरातील वाढता वाहतूक ताण कमी करण्याबरोबरच बाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागात येण्याची गरज कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. _ Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan

याशिवाय द्वारका सर्कल अंडरपास यासारख्या महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांचाही या व्यापक आराखड्यात समावेश आहे. कुंभमेळ्याच्या काळात गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा प्रकल्पांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

विशेष म्हणजे, प्रस्तावित रस्त्यांकडे केवळ वाहतुकीची सुविधा म्हणून न पाहता त्यांचा मल्टी-युटिलिटी कॉरिडोर म्हणून विकास करण्याचे नियोजन आहे. भविष्यात या कॉरिडोरचा उपयोग पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीजवाहिन्या, ऑप्टिकल फायबर आणि नैसर्गिक वायू यांसारख्या विविध पायाभूत सुविधांसाठी करता येणार आहे. _Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा न राहता नाशिकच्या दीर्घकालीन विकासाला गती देणारा टप्पा ठरावा, या दृष्टीने वाहतूक, धार्मिक पर्यटन आणि शहरी पायाभूत सुविधांचा एकत्रित विकास करण्यावर भर दिला जात आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरसोबत शिर्डी आणि शनिशिंगणापूरचा समावेश असलेले रीजनल धार्मिक पर्यटन सर्किट विकसित झाल्यास या भागातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कुंभमेळा 2027 साठी उभारण्यात येणाऱ्या या पायाभूत सुविधांचा लाभ कुंभमेळ्यानंतरही नाशिक जिल्ह्याला दीर्घकाळ मिळणार असून, वाढत्या लोकसंख्येसह पर्यटन आणि वाहतुकीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे.

-महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Kumbh 2027 Infrastructure Plan

Nashik Rickshaw Drivers Bengali Baba Mahaprasad : नाशिक-पुणे महामार्गावरील रिक्षाचालकांची बंगाली बाबांप्रती श्रद्धा; ३० वर्षांची महाप्रसादाची परंपरा कायम

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *