Nashik District Court inauguration by CJI Bhushan Gavai6. नाशिक न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उद्धव ठाकरे यांची आठवण सांगितली.

Nashik District Court inauguration by CJI Bhushan Gavai

नाशिक : नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचे उद्घाटन आणि नवीन वाहनतळाच्या भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा शनिवारी (ता. २७ सप्टेंबर) देशाचे सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्या हस्ते पार पडला. या विशेष प्रसंगी सरन्यायाधीश प्रथमच नाशिकमध्ये आले होते.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई म्हणाले

नाशिक जिल्हा न्यायालयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्घाटनही माझ्याच हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आपण दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहू असे सांगितले होते. आज उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे पण उद्धवजी माझ्यासोबत नाहीत. खरं म्हणजे योग नव्हता,” असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांची आठवण काढली.

सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांनी नूतन इमारतीचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “खरं तर कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. मात्र ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे.” त्यांनी नमूद केले की नाशिक न्यायालयाला तब्बल 140 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे आणि याच पार्श्वभूमीवर येथे हेरिटेज कक्ष देखील उभारण्यात आला आहे.

सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई बोलतांना व्हिडिओ पाहा 👇

सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई म्हणाले की, “देशात महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते. येथेच्या सुविधा निश्चितच उत्कृष्ट आहेत. देशातील सर्व जिल्हा न्यायालयांच्या इमारतींमध्ये ही इमारत अत्यंत सुंदर आहे.” त्यांनी आणखी सांगितले की, “2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना मी या इमारतीच्या भूमिपूजनाला उपस्थित होतो आणि आज उद्घाटनही माझ्याच हस्ते होत आहे, ही आनंदाची बाब आहे.”

गवई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. “न्यायालयांच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचेही कौतुक केले.

या उद्घाटन सोहळ्यात सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. नाशिक वकील संघाने तयार केलेला माहितीपट सादर करण्यात आला. तसेच हेरिटेज बोर्डचे अनावरण आणि हेरिटेज बुकचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते, न्यायमूर्ती एम.एन. सोनम, न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे, न्यायमूर्ती ए.एस. गडकरी, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, ॲड. अविनाश भिडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Source : Daily Hunt

नवीन ताज्या घडामोडी 👇: Nashik District Court Inauguration :1 सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन

नाशिकच्या विजयश्री चुंबळे यांनी इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर पॅशन फ्रुट शेतीत लिहिली यशोगाथा

अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसर — National Film Festival Award जिंकून मिळवला ऐतिहासिक सन्मान

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik District Court Inauguration :1 सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed