Nashik Voter Registration Camp October 2026
नाशिक | दि. १६ ऑक्टोबर २०२६
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये १७ व १८ ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादीत नवीन नाव नोंदविणे, नाव व तपशिलातील दुरुस्ती करणे तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत हरकत नोंदविण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी पात्र नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबिरे _ Nashik Voter Registration Camp October 2026
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांकडून मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
कोणत्या अर्जाद्वारे काय करता येईल?
- नमुना ६ (Form 6): नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी.
- नमुना ७ (Form 7): मतदार यादीतील नाव वगळण्यासंदर्भात हरकत नोंदविण्यासाठी.
- नमुना ८ (Form 8): मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा नियमानुसार आवश्यक बदल करण्यासाठी.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांना नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. आवश्यकतेनुसार घोषणापत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
२६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर २०२६ आहे.
ज्या नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, त्यांनी पात्रतेनुसार नमुना ६ आणि आवश्यक घोषणापत्र सादर करावे. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ वापरता येईल. बीएलओ यांच्याकडून नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. _ Nashik Voter Registration Camp October 2026
ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध
नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणि संबंधित अर्ज सादर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलचा वापर करता येईल.
अधिकृत संकेतस्थळ: https://voters.eci.gov.in
नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नाशिक
दूरध्वनी: ०२५३-२३१०५२३
प्रतिनिधी: महादूत जनबिंदू | प्रतिनिधी – दीपक सरोदे _ Nashik Voter Registration Camp October 2026


Really impressed with the variety of games available here. It feels like a premium experience and the interface is very intuitive. Highly recommend br9096betvip to anyone looking for a top-tier site.