Lasalgaon Farmers Demand Protest Warningशेतकऱ्यांच्या मागण्यांवर ९ सप्टेंबरपूर्वी ठोस निर्णय न झाल्यास १० सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा

Lasalgaon Farmers Demand Protest Warning

शिरवाडे वाकद : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीची रक्कम तातडीने मिळावी, रोख चुकवतीबाबत व्यवहार्य व्यवस्था करावी तसेच बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या विविध मूलभूत अडचणींचे तातडीने निराकरण करावे, या मागण्यांसाठी लासलगाव शहर विकास समिती आक्रमक झाली आहे.

समितीच्या वतीने बाजार समिती प्रशासन तसेच लासलगाव मर्चंटस् असोसिएशनकडे विविध मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास दि. १० सप्टेंबर २०२६ पासून बाजार समिती कार्यालय परिसरात शांततामय व सनदशीर मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. _ Lasalgaon Farmers Demand Protest Warning

शेतमाल विक्रीनंतर चुकवतीची रक्कम मिळण्यास होणारा विलंब हा शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, इंधन, शेतीची औजारे, वाहतूक भाडे तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना विक्रीच्या पैशांची तातडीने आवश्यकता असते. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने चुकवती होत असल्यास ती कोणत्याही विलंबाशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी, तसेच लागू कायदे व नियमांच्या चौकटीत रोख चुकवतीची व्यवहार्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

निवेदनात शेतकरी निवासाची सुविधा, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, वाहनांची शिस्तबद्ध रांग, वाहन आगमनक्रमानुसार पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि वजनमापातील अडचणी दूर करणे या मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय नाशवंत शेतीमालाची तातडीने चुकवती करावी, लिलाव बंद ठेवण्यापूर्वी शेतकऱ्यांना पूर्वसूचना द्यावी, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, तसेच पिंपळगाव बसवंत व इतर बाजार समित्यांच्या धर्तीवर खळ्यावर खरेदीदारामार्फत चुकवतीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. _ Lasalgaon Farmers Demand Protest Warning

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना गणवेशाची सक्ती करावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संस्थापकांची प्रतिमा मुख्य कार्यालयासह उपबाजार समिती कार्यालयात दर्शनीय ठिकाणी कायमस्वरूपी लावावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांवर बाजार समिती प्रशासन, मर्चंटस् असोसिएशन, अडते-व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने घेऊन प्रत्येक मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, तसेच निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशी मागणी समितीने केली आहे. _ Lasalgaon Farmers Demand Protest Warning

दि. ९ सप्टेंबर २०२६ पूर्वी मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन त्याची लेखी माहिती न दिल्यास, दि. १० सप्टेंबर २०२६ पासून उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा लासलगाव शहर विकास समितीने दिला आहे.

यावेळी प्रकाश पाटील, संदीप उगले, उत्तम वाघ, प्रमोद पाटील, राजेंद्र कराड, धर्मेश जाधव, बाळासाहेब दौंड, विष्णू साबळे, उत्तम जगताप, विजय जाधव, साहेबराव खलसे, आदित्य काकळीज, ओंकार अष्टमकर, यश भोगे आदी उपस्थित होते.

“आमचा कोणत्याही व्यापारी, अडते अथवा व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक आकस नसून शेतकऱ्यांना न्याय्य, पारदर्शक, सुलभ आणि वेळेत सेवा मिळावी, हाच आमचा उद्देश आहे.”
— प्रकाश पाटील, माजी पं.स. समिती सदस्य

प्रतिनिधी : अय्याज शेख _ Lasalgaon Farmers Demand Protest Warning

Four Revenue Employees Suspended In Nashik : नाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Lasalgaon Farmers Demand Protest Warning : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लासलगाव शहर विकास समिती आक्रमक; 10 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *