Four Revenue Employees Suspended In Nashikनाशिक महसूल विभागात मोठी कारवाई; मंडळ अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित.

Four Revenue Employees Suspended In Nashik

नाशिक : नाशिक जिल्हा महसूल प्रशासनात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये निफाड तहसील कार्यालयांतर्गत पिंपळगाव बसवंत येथील मंडळ अधिकारी अनिल एकनाथ रोकडे, दिंडोरी तहसील कार्यालयातील मोहाडीच्या तलाठी मनीषा अशोक पाटील, नाशिक तहसील कार्यालयातील गंगापूरचे तलाठी शशिकांत वाल्मीक चितळकर आणि नाशिक शहर-१ अपर तहसील कार्यालयातील तलाठी सागर शेलार यांचा समावेश आहे. _ Four Revenue Employees Suspended In Nashik

मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदावर कार्यरत असताना हाताळलेल्या महसुली नोंदी, फेरफार प्रकरणे, कागदपत्रे आणि दप्तराची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पुढील विभागीय चौकशीसाठी दोषारोपपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

ही कारवाई नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा भूखंड/सदनिका प्रकरणाच्या चौकशीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिका हद्दीतील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या २० टक्के सदनिकांच्या संदर्भातील प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात महसूल नोंदी आणि फेरफार प्रक्रियेतील कथित अनियमिततांचाही तपास करण्यात आला आहे. _ Four Revenue Employees Suspended In Nashik

या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली होती. तपासादरम्यान विविध विभागांतील अधिकारी तसेच संबंधित विकासकांवरही कारवाई झाल्याचे वृत्त आहे.

निलंबित चारही कर्मचाऱ्यांनी संबंधित पदावर असताना हाताळलेल्या प्रकरणांची दप्तर तपासणी करून अनियमिततेशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे विभागीय चौकशीत नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात आणि या प्रकरणात पुढे आणखी कोणावर कारवाई होते, याकडे आता महसूल विभागासह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे : निलंबन ही प्रशासकीय कारवाई असून, संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम जबाबदारीबाबत निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत.

प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Four Revenue Employees Suspended In Nashik

Himgauri Aher-Adke at DARSHAN Roundtable Nashik : ‘DARSHAN’ गोलमेज परिषदेत नाशिकच्या शाश्वत विकासाची संकल्पना; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे प्रतिपादन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed