Nashik Municipal Corporation Five Subject Committees 2026
नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच विषय समित्यांची रचना जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पाचही समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या विषय समित्यांमध्ये महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, आरोग्य व सहाय्य समिती, विधी समिती आणि शाळा समिती यांचा समावेश आहे.
या समित्यांच्या माध्यमातून संबंधित विषयांवरील महापालिकेच्या कामकाजाचा आढावा, विविध प्रस्तावांवरील चर्चा तसेच नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर कार्यवाही करण्याच्या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त होते. नाशिक महापालिकेच्या अधिकृत माहितीनुसार महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलां व बालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात.
पाच विषय समित्या _ Nashik Municipal Corporation Five Subject Committees 2026
- महिला व बाल कल्याण समिती
- शहर सुधारणा समिती
- आरोग्य व सहाय्य समिती
- विधी समिती
- शाळा समिती
प्रत्येक समितीवर ९ सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने आता या समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. या पदांसाठी कोणाची निवड होते, याबाबत महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेत यापूर्वी स्थायी समितीच्या १६ सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडही बिनविरोध झाली होती.
दरम्यान, पाच विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या पुढील प्रक्रियेकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले असून, या पदांवर कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिनिधी : दीपक सरोदे Nashik Municipal Corporation Five Subject Committees 2026


[…] Nashik Municipal Corporation Five Subject Committees 2026 : नाशिक महापालिक… […]
I was looking for a stable place to get the app and this worked perfectly. The installation was smooth and everything runs great on my device. Check it out at juan365downloadapk