Nashik Hiray College National Pledge Against Drug Abuse
पंचवटी : विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘National Pledge Against Drug Abuse’ या राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील नेचर क्लब व राष्ट्रीय सेवा योजना (NSS), पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभाग व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच CIPMC, नाशिक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता._ Nashik Hiray College National Pledge Against Drug Abuse
यावेळी भारत सरकारच्या वतीने CIPMCचे डॉ. विशाल काशीद आणि श्री. ऋषिकेश मानकर यांनी विद्यार्थ्यांना शासनाचे अमली पदार्थविरोधी धोरण, विविध योजना आणि उपक्रम याबाबत माहिती दिली. तसेच कार्यक्रमाची उद्दिष्टे व भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना नशेच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी “मी नशा करणार नाही आणि इतरांनाही नशा करू देणार नाही” अशी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. शशिकांत शिसोदे यांनी केले.
-प्रतिनिधी : प्रथमेश महाले_ Nashik Hiray College National Pledge Against Drug Abuse


[…] […]