Chandwad Child Care Scheme Review Meeting
चांदवड : अनाथ, निराधार तसेच एकल माता किंवा एकल पुरुष पालक असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना कुटुंबाच्या वातावरणात संगोपन, शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’चा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत चांदवड शहरातील प्रत्येक अंगणवाडी प्रभागातील एकल माता व एकल पुरुष पालक असलेल्या बालकांची माहिती घेण्यात आली. संबंधित अंगणवाडी सेविकांनी आतापर्यंत किती अर्ज व फॉर्म जमा केले, त्यापैकी किती प्रकरणे मंजूर झाली आणि किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला._ Chandwad Child Care Scheme Review Meeting
पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरणे तातडीने पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले._ Chandwad Child Care Scheme Review Meeting
या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक असलेली तसेच पालकांच्या मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्त होणे, गंभीर आजार, कौटुंबिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे संगोपनाची गरज असलेल्या बालकांना पात्रतेनुसार आर्थिक सहाय्य दिले जाते. या माध्यमातून बालकांचे शिक्षण सुरू राहण्यासोबतच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होते.
बैठकीस पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी BDO मच्छिंद्र साबळे, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप तालुका महिला पदाधिकारी गीताताई झाल्टे, जिल्हा परिषदेचे शिक्षक, चांदवड शहरातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.
यावेळी प्रत्येक अंगणवाडी सेविकेने आपल्या कार्यक्षेत्रातील एकल माता व एकल पुरुष पालक असलेल्या सर्व पात्र बालकांची माहिती संकलित करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच लाभापासून एकही पात्र बालक वंचित राहू नये, यासाठी अंगणवाडी व आशा सेविकांनी पालकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, चांदवड शहरातील अधिकाधिक गरजू बालकांना शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनी समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela : सिन्नरकडून नाशिककडे 5 दिवस 100% वाहतूक बंद
Chandwad Child Care Scheme Review Meeting

