Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Melaसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नर–नाशिक वाहतुकीचे विशेष नियोजन; पर्वणी काळात सलग ५ दिवस वाहतूक बंद ठेवण्याची प्राथमिक माहिती.

Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीबाबत मोठे नियोजन करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात सलग ५ दिवस सिन्नरपासून नाशिकच्या दिशेने १०० टक्के वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वाहतूक विभागाच्या बैठकीत देण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत सुमारे ५० दिवस वाहतूक नियोजन करण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नियंत्रणासाठी तब्बल ५०० वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

या वाहतूक निर्बंधांचा सिन्नर MIDC मधील उद्योग, कच्चा माल आणि तयार मालाच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी उद्योजकांनी आधीपासूनच वाहतुकीचे आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सिन्नर MIDC मधील उद्योजकांच्या कार आणि कंपनी बससाठी विशेष पास देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात उद्योगांची वाहतूक आणि दैनंदिन कामकाज प्रभावित होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजनाची अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंतिम वाहतूक आराखडा आणि निर्बंधांबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती आल्यानंतर त्यानुसार पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

-प्रतिनिधी : कुणाल दानेच Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela

Surgana Earthquake Five Tremors Nashik : सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सलग पाच धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Sinnar Nashik Traffic Restrictions Simhastha Kumbh Mela : सिन्नरकडून नाशिककडे 5 दिवस 100% वाहतूक बंद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed