Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshanश्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांसाठी विशेष दर्शन आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshan

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने देवस्थान प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी मंदिर प्रशासनासह पोलिसांकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे. तर प्रत्येक श्रावण सोमवारी दर्शनाची वेळ पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे.

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील दर्शन रांगेत वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांना थांबता येणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी आणि प्राथमिक आरोग्य कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक ग्रामस्थांसाठी मंदिराच्या पश्चिम दरवाजातून स्वतंत्र प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्थांना सकाळी ६ ते १०.३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत दर्शन घेता येईल. यासाठी स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे._ Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshan

सामान्य धर्मदर्शनाची रांग पूर्व दरवाजातून, तर देणगी दर्शनाची रांग उत्तर दरवाजातून राहणार आहे. गर्भगृह दर्शन भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत श्रावणानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दर्शन आणि प्रदक्षिणेसाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मंदिर परिसरात पिशव्या नेण्यास मनाई करण्यात आली असून भाविकांनी कमीत कमी साहित्य सोबत आणावे. मौल्यवान वस्तू आणणे टाळावे. गर्दीत बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. तसेच कोणाची संशयास्पद हालचाल आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी._ Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshan

बाहेरून येणाऱ्या भाविकांनी वाहने केवळ अधिकृत वाहनतळावरच पार्क करावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले आहे.

श्रावण काळात त्र्यंबकेश्वरमध्ये वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान आणि पोलिस प्रशासनाने केले आहे.

Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshan

Chandwad Tiranga Yatra 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये भव्य तिरंगा यात्रा; आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांच्या उपस्थितीत उत्साहात आयोजन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

4 thoughts on “Tryambakeshwar Temple Shravan 2026 Darshan : श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर १७ तास खुले; सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून दर्शन”
  1. [7208]cgebet Official Login | Best Online Slots and GCash Bonuses,cgebet provides a secure platform to download the mobile app and claim your GCash casino bonus. Learn how to play baccarat and win big. Join and start playing today! visit: cgebet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed