Har Ghar Tiranga Rally at Hiray College Nashik
पंचवटी, नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्रसेना (NCC) विभागाच्या वतीने देशभक्तीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, NCC कॅडेट्स, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेली जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे, उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. निकम, लेफ्टनंट सचिन सोनवणे तसेच राष्ट्रीय छात्रसेना विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-प्रतिनिधी : प्रथमेश महाले Har Ghar Tiranga Rally at Hiray College Nashik


[…] […]
[…] […]