Chandwad MD Drugs Seizure MH41BL2720
नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोलनाक्यावर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे एमडी (Mephedrone) ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एका किया कारसह तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंबईहून मालेगावच्या दिशेने एका किया ( MH41BL2720 ) कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांच्या विशेष पथकाने आणि चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या चांदवड टोलनाक्यावर नाकाबंदी केली.
नाकाबंदीदरम्यान संशयित किया कार अडवून तिची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनातून प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ड्रग्जचा साठा, वाहन आणि तीन संशयितांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाई सुरू केली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब गुळे, विक्रम बस्ते, स्वप्निल रंधे, स्वप्निल जाधव, सुनील जाधव, अमोल जाधव, दिनेश सूळ, प्रदीप आजगे आणि शंकर पवार यांनी सहभाग घेतला.
सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचे अचूक वजन व बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
अमली पदार्थांविरोधातील या धडक कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी : संजय जाधव Chandwad MD Drugs Seizure


[…] […]
Really impressed with the variety of games available here. It keeps things exciting and the customer support is top notch. Cheers to okbetgamesonline
The variety of games here is insane. I spent all weekend exploring and I am still finding new stuff to play. Highly suggest visiting bdnagad88n for some real action.