Ashadhi Ekadashi Chandwad Toll Banana Distributionआषाढी एकादशीनिमित्त चांदवड टोल प्लाझावर वाहनचालकांना केळी वाटप करून टोल कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

Ashadhi Ekadashi Chandwad Toll Banana Distribution

चांदवड प्रतिनिधी : संजय जाधव

चांदवड : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त चांदवड टोल प्लाझावरील टोल कामगारांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. टोल प्लाझाचे मॅनेजर मुकेश पोहणकर यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्माई यांच्या प्रतिमेची आरती व पूजा करण्यात आली. पूजेचे विधी सोपान पवार व बाप्पू जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.

यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल कर्मचाऱ्यांच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तीबरोबरच समाजसेवेचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. वाहनचालकांना शुभेच्छा देत करण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच टोल कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी टोल प्लाझावरील प्रतिक शिंदे, मा. नगरसेवक रवी भाऊ आहिरे, रवी पवार, प्रदीप निरभवणे, विजयसिंग हाडे, नामदेव वारुळे, पुरोहित, भूषण दीक्षित, समाधान बनकर, बन्सीलाल कासव, शशी थोरमिसे, हरिभाऊ ठाकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली.

Ashadhi Ekadashi Chandwad Toll Banana Distribution

Dharmendra Pradhan Resignation Letter : “…माझं मन अत्यंत व्यथित” म्हणत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *