Mahendra Sansare Self-Immolation Warning Nashik
नाशिक | प्रतिनिधी
बिल्डरविरोधात फौजदारी कारवाईची मागणी करत महेंद्र प्रकाश संसारे यांनी 30 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, 6 मार्च 2026 रोजी त्यांचे घर बेकायदेशीररित्या पाडण्यात आले तसेच घरातील सोने, चांदी, टीव्ही, फर्निचर, कपाट, वॉशिंग मशीनसह इतर मौल्यवान वस्तू गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेत सुमारे 42 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या प्रकरणात बिल्डर हरिश मधुशप्रसाद गुप्ता, त्यांचे प्रतिनिधी, सायमन सॅमसन भंडारे (चेअरमन) आणि प्रकाश आनंद गांगुर्डे (सेक्रेटरी) यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी संसारे यांनी केली आहे.
तसेच पोलिसांनी तक्रारीची निष्पक्ष चौकशी केली नसल्याचा आरोप करत त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.
तक्रारीची वरिष्ठ स्तरावर पुनर्चौकशी करावी.
चौकशी अहवाल व समजपत्राची प्रत लेखी स्वरूपात द्यावी.
मालकी हक्क व संबंधित कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करावी.
आवश्यक पुरावे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी.
तक्रारदाराला कोणताही दबाव किंवा धमकी होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी.
मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास 30 जुलै 2026 रोजी गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
टीप : या वृत्तातील आरोप व दावे हे तक्रारदार महेंद्र प्रकाश संसारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनावर आधारित आहेत. संबंधित बिल्डर किंवा इतर संबंधित व्यक्तींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
Mahendra Sansare Self-Immolation Warning Nashik
मोफत शालेय गणवेश योजनेत अनियमितता; निकृष्ट गणवेश प्रकरणी १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा


[…] […]