Bambhori Notebook Distribution Program Jalgaon
जळगाव प्रतिनिधी | सुरेश पाटील
जळगाव जिल्ह्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बांभोरी प्र. चां. येथे विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला तक्रार निवारण समिती आणि सखी सावित्री समिती यांच्या सभाही पार पडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांभोरी प्र. चां.चे सरपंच श्री. सचिन बिर्हाडे उपस्थित होते, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जगदीश नन्नवरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
यावेळी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या कु. माधुरी सुखदेव कोळी हिचा अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थिती भत्त्याचे धनादेशही लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील महिला, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित अनियमिततांवर प्रश्नचिन्ह; चौकशी, आदेश तरीही कारवाई शून्य?

