Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026२२ ते २६ जुलैदरम्यान होणाऱ्या महसूल समाधान शिबिरांसाठी जळगाव प्रशासनाची तयारी पूर्ण.

Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026

जळगाव प्रतिनिधी : सुरेश पाटील

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान अंतर्गत २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी महसूल समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिबिरांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक पार पडली.

बैठकीला महसूल, कृषी, जिल्हा परिषद, लीड बँक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी आवश्यक नियोजन, विभागनिहाय समन्वय, लाभांचे वितरण आणि विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी सर्व विभागांना त्यांच्या विभागामार्फत लाभ मिळणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या अद्ययावत याद्या तयार करून १३ जुलै २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) विजयकुमार ढगे, तहसीलदार (महसूल) श्रीमती ज्योती गुंजाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. हारकर यांनी केले.

Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; जळगावने सलग चौथ्यांदा १०० टक्के निधी खर्चाचा मान राखला

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Jalgaon Revenue Solution Camp Review Meeting 2026 : जळगावात २२ ते २६ जुलैदरम्यान महसूल समाधान शिबिरांचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *