32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwadचांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक, एक आरोपी फरार.

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad

चांदवड | प्रतिनिधी: संजय जाधव

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई करत चांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सिन्नर तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण १४ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. ४) रोजी सकाळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदवड-लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात सापळा रचला होता. सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमारास संशयित एमएच ०१ बीटी ८८१३ क्रमांकाची कार अडवून तिची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान कारच्या डिक्कीत ३२ किलो वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ६ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी संदीप रामनाथ सानप (वय ३६, रा. कानडी मळा, ता. सिन्नर), अनिल केशव बोडके (वय ३०, रा. मापारवाडी, ता. सिन्नर) आणि यश संदीप मोरे (वय २४, रा. कानडी मळा, ता. सिन्नर) यांना ताब्यात घेऊन अटक केली.

दरम्यान, रवी चिमाजी कातकाडे (रा. सायखेडा, ता. निफाड) हा पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर कारचा दरवाजा उघडून घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

या कारवाईत गांजा, कार व इतर साहित्य असा एकूण १४ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पीएसआय हेमंत फड, पोलिस उपनिरीक्षक हर्षल भोळे, संतोष दोंदे, पोलिस हवालदार सतीश घुटे, सतीश जगताप, प्रवीण बळकट, गांगुर्डे, रवींद्र गवळी, विश्वनाथ धारबळे, पोलिस शिपाई किशोर बोडके, हवालदार हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब न-हे करत आहेत.

32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad

जेलरोडची ऐतिहासिक पाण्याची टाकी इतिहासजमा; आठवणींना भावपूर्ण निरोप

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “32 Kg Ganja Seized in Chandwad Dighwad : चांदवड : दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed