Malegaon Protest Turns Violent
मालेगावमध्ये साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी नागरिकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. आरोपी विजय खैरनारला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या माहितीने नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. या मोठ्या जनसमुदायाने आज आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.
मोर्चादरम्यान वातावरण तापले आणि काही आंदोलकांनी थेट मालेगाव कोर्टाच्या प्रवेशद्वाराचे गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना आवर घातला. कोर्ट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. (Malegaon Protest Turns Violent)
डोंगराळे गावातील या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी विजय खैरनार हा नागरिकांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरला आहे. घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळत असताना, पोलिसांनी आरोपीला अटक करून सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवली होती. (Malegaon Protest Turns Violent)
आज आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करायचे होते; मात्र वाढत्या तणावामुळे आणि परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिस आणि न्यायालय प्रशासनाने आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले. त्यामुळे उपस्थित जमाव अधिक आक्रमक होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. (Malegaon Protest Turns Violent)
नागरिकांची एकच मागणी आहे – या राक्षसी कृत्यासाठी आरोपीला तात्काळ आणि कठोर अशी फाशीची शिक्षा द्यावी. महिलांची संख्या देखील मोर्चात मोठी होती, ज्यातून समाजातील संतापाची तीव्रता स्पष्ट जाणवत होती.
सध्या कोर्टाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
MHDU News : Vishal Bhadane
मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या


Heard good buzz about 9096betvip and gave it a shot. They’re super legit and professional. Definetly a place to check out! Get your game on at 9096betvip!
22bet is ok. The 22betbonus is worth it! Just be cautious and dont overplay. Check out the bonus: 22betbonus