Rahul Dhikale Nashik BJP Election Charge नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राहुल ढिकले यांच्याकडे धुरा; ‘शंभर प्लस’चे लक्ष्य ठेवून भाजपची तयारी सुरू!

Rahul Dhikale Nashik BJP Election Charge

नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली असून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक शहराची धुरा आता ‘पूर्व’चे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी नाशिक उत्तर व दक्षिण अशा दोन विभागात वाटणी करण्यात आली असून अनुक्रमे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि गिरीश पालवे यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेची धुरा दादा जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

भाजपने यावेळी “शंभर प्लस”चे लक्ष्य ठेवत संघटनात्मक पातळीवर मजबूत यंत्रणा उभी करण्याचा निर्धार केला आहे. नाशिकमध्ये पुन्हा सत्ता स्थापण्यासाठी ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे शहराच्या निवडणुकीचे नेतृत्व सोपवले आहे. ढिकले हे दोन वेळा आमदार, नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यांचा स्थानिक अनुभव आणि संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)

सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजनही त्यांच्या मतदारसंघात होणार असल्याने हा काळ नाशिककरांसाठी अत्यंत निर्णायक आहे. जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची “निवडणूक प्रभारी” म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या आणि ॲड. ढिकले यांच्या नेतृत्वात नाशिक महानगरपालिका निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मंत्री संजय सावकारे ‘निवडणूक प्रभारी’ असतील. जळगाव शहराची जबाबदारी राजू (मामा) भोळे, जळगाव पूर्व (रावेर) नंदू महाजन, आणि जळगाव पश्चिम आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)

नंदुरबारची जबाबदारी पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून काम पाहतील. धुळे शहरात अनुप अग्रवाल तर ग्रामीण भागाची जबाबदारी कुणाल पाटील यांच्याकडे आहे, आणि मंत्री जयकुमार रावल प्रभारी म्हणून कार्यरत राहतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने “शंभर प्लस”चे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे.
भाजपने विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा निर्धार केला असल्याचे ॲड. राहुल ढिकले यांनी सांगितले. (Rahul Dhikale Nashik BJP Election Charge)

Rahul Dhikale Nashik BJP Election Charge
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राहुल ढिकले यांच्याकडे धुरा; ‘शंभर प्लस’चे लक्ष्य ठेवून भाजपची तयारी सुरू!

mhdunews #mhdusocial #Nashik #NashikPolitics #RahulDhikale #BJPNashik #NashikElection #NashikMahanagarPalika #MaharashtraPolitics #GirishMahajan #DevendraFadnavis #PoliticalUpdate #MHDUnewsExclusive

Nashik NMC 150 crore scam : काम सुरू होण्यापूर्वीच ठेकेदारावर १५० कोटींची उधळण; मनपाचा अजब कारभार चर्चेत

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

9 thoughts on “Rahul Dhikale Nashik BJP Election Charge : नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा राहुल ढिकलेंकडे; ‘100 प्लस’चे भाजपचे लक्ष्य!”
  1. Alright, 257bet5, you’re on! Gave it a whirl and it’s not bad, pretty standard fare but the bonuses were alright. Could use a bit of a refresh but hey, it does the job. Check out 257bet5 if you’re looking for something simple.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *