Pune Court Suicide Caseपुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात न्याय न मिळाल्याने व्यक्तीची आत्महत्या; २५ वर्षांच्या लढ्यानंतर घेतला अंत

Pune Court Suicide

पुणे (प्रतिनिधी) – न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात घडली आहे. नामदेव जाधव या ५५ वर्षीय व्यक्तीने (Pune Court Suicide) कोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव हे सन २००० पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत होते. आपल्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने ते अत्यंत नैराश्यात गेले होते. शेवटी त्यांनी न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत मृत्यूला कवटाळले.

घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असता, जाधव यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. या चिट्ठीत त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, “मला न्याय मिळाला नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे.”

या घटनेमुळे पुन्हा एकदा न्यायप्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक नागरिक २५ वर्षांपासून न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवत होता, आणि शेवटी न्याय न मिळाल्याने जीव देण्याचा निर्णय घेतो — हे समाजासाठी चिंताजनक आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात न्यायालय प्रशासन व संबंधित प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📍 घटना स्थळ: शिवाजीनगर न्यायालय, पुणे
📅 दिनांक: 15 ऑक्टोबर 2025

MHDU News Pune Court Suicide

Nashik Crime: Nashik Vani Police Action, Reels ने दहशत निर्माण करणाऱ्या 3 युवकांना वणी पोलिसांचा दणका; आंबेडकर चौकातून काढली धिंड

🎙️ #MHDUUpdate | #PuneNews | #BreakingNews | #CourtCase | #SuicideCase | #PuneCrime | #MaharashtraNews | #MHDU | #mhdunews | #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Pune Court Suicide Shocker : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना ; “कोर्टातच घेतला शेवटचा श्वास!”; सन 2000 पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत…..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *