Nashik encroachment crime nexus – NMC negligence under spotlightनाशिकमध्ये अतिक्रमणामुळे गुन्हेगारीला चालना; मनपाच्या दुर्लक्षावरून नागरिकांत संताप!

Nashik NMC Encroachment Crime

नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढत्या अतिक्रमणांचा गुन्हेगारीशी थेट संबंध उघड झाला आहे. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की शहरातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे गुन्हेगारांना लपण्यासाठी आणि थांबण्यासाठी सुरक्षित ठिकाणे उपलब्ध झाली आहेत. ( Nashik NMC Encroachment Crime )

यावरून स्पष्ट होते की अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. महानगरपालिकेच्या वतीने जरी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात असली तरी ती केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. परिणामी, शहरात गुन्हेगारीला वाढती किनार मिळाली आहे.

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आरटीओ पंचवटी परिसरातील अतिक्रमण हटविले. तपासात आढळले की या परिसरात गुन्हेगार लपण्यासाठी व संशयास्पद व्यवहार करण्यासाठी जागा वापरत होते. या कारवाईनंतर अपेक्षित होते की महापालिका शहरभर धडक मोहीम राबवेल, मात्र तशी कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.

अतिक्रमण विभागाकडून सातत्याने “स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव” किंवा “बेरोजगारी” अशा कारणांची आडोसा घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी घेऊन ठोस पावले उचलण्यास मनपा टाळाटाळ करत आहे.

याच आठवड्यात आरटीओ परिसरात झालेल्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण उभे राहिले. संबंधित दुकानदारांशी बोलल्यावर त्यांनी “आमचे मनपामध्ये बोलणे झाले आहे” असे सांगितले, पण कोणाशी झाले हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

या सर्व प्रकारावरून स्पष्ट होते की नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळेच गुन्हेगारीला बळ मिळत आहे. आता तरी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकरणी ठोस निर्णय घेतील का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Nashik NMC Encroachment Crime

MHDU News – Vishal Bhadane

Vasant Gite Nashik Slams BJP : – वसंत गीते यांचा भाजपवर गंभीर आरोप; ‘समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नका!0

Former Corporator Mukesh Shahane Crime, Questioned by Crime Branch – माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि 2 वकील यांची गुन्हे शाखेकडून चौकशी

Nashik #Crime #Encroachment #NMC #NashikPolice #ManishaKhatri #SandeepKarnik #MHDU #MHDUnews #mhdunews #mhdusocial

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

One thought on “Nashik NMC Encroachment Crime – नाशिकच्या अतिक्रमणात मोठा खुलासा ; नाशिकात गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या अतिक्रमणात मनपाचाही सहभाग उघड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *