Nashik NMC 150 crore scam
नाशिक महानगरपालिकेचा अजब कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली विश्वराज कंपनीला १४०० कोटी रुपयांचा वादग्रस्त ठेका देण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच या ठेकेदार कंपनीवर तब्बल १५० कोटी रुपयांची उधळण करण्यात येत असल्याने संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
महापालिकेकडून करारानुसार निधी दिला जात असल्याचा दावा केला जात असला, तरी वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या सूचनांमुळे अधिकारी गप्प बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
पीपीपी तत्वावर राबवण्यात येणारा हा प्रकल्प महापालिकेला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरणार असल्याचे आरोप होत आहेत. शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तांत्रिक बाबींवर प्रश्न उपस्थित झाल्याने नगरविकास विभागाने महापालिकेकडे अहवाल मागवला होता. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मंजुरीच्या आधारे शासनाने ७०-३० भागीदारीनुसार आदेश देत प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.
भाजप आमदार प्रविण दरेकर, ॲड. निरंजन डावखरे, प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांसह सहा आमदारांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून या वादग्रस्त प्रकल्पाला कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही महायुतीच्या सत्तेत यावरून अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Nashik NMC 150 crore scam)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभेत सांगितले होते की, केंद्रीय प्रदूषण मंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी न घेता हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. तरीही जुलै महिन्यात मक्तेदार कंपनीसोबत करार करून तिला कार्यारंभ आदेश देण्यात आला. आणि आता काम सुरू होण्यापूर्वीच कंपनीला १५० कोटींचा निधी अदा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. (Nashik NMC 150 crore scam)
निधी पूर्ततेसाठी कर्ज:
या निधीच्या पूर्ततेसाठी महापालिकेला जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सत्तेतील एका वरिष्ठ मंत्र्याचा हात या प्रकरणात असल्याचे बोलले जात असून, मक्तेदार कंपनीच्या फाइल्सला मंजुरी देण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आल्याचे सांगितले जाते. (Nashik NMC 150 crore scam)
MHDU News: Vishal Bhadane

@Girish mahajan @nmc #nmc #Scam #Nashik


[…] Nashik NMC 150 crore scam : काम सुरू होण्यापूर्वीच ठेक… […]
Been hitting up 666betcasino lately, and it’s a blast. Great selection of slots and some killer bonuses. Don’t miss out: 666betcasino.
JiliWinLogin always makes accessing the games so smoooth! No hassle at all. Quick and easy to log in and start playing. Appreciate the convenience, guys! jiliwinlogin