Nashik Law Fort
या नावाला साजेशी कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी सातपूर येथे मोठी कारवाई करत आरपीआय आठवले गटाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे.
सातपूर येथील एका बारमध्ये भूषण लोंढे याने गोळीबार केला होता. या घटनेत एक जण जखमी झाला होता. तक्रार दिल्याचा राग आल्यानंतर भूषण लोंढेने हॉटेल मालकाच्या कुटुंबाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भूषण लोंढे अद्याप फरार आहे.
नाशिक पोलिसांनी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरवत आज सकाळी सातपूर भागात मोठ्या बंदोबस्तात आरोपींची धिंड काढली.
या कारवाईदरम्यान “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” म्हणजेच Nashik Law Fort अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली.
प्रकाश लोंढे हा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की Nashik Law Fort मध्ये कायद्याच्या पलीकडे कोणीही नाही.
Nashik Law Fort

mhdunews #mhdusocial #Nashik #Satpur #NashikPolice #CrimeNews #RPI #Maharashtra


[…] […]