Nashik Citylink Ticketless Travel Actionसिटीलिंकच्या विशेष तपासणी मोहिमेत विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई.

Nashik Citylink Ticketless Travel Action

नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) बससेवेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ऑगस्ट महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान २८४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले असून, त्यांच्याकडून १४ हजार ३२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सिटीलिंककडून नाशिक शहरासह शहर हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंत बससेवा चालविली जाते. १ ते ३१ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.

प्रवाशांनी निर्धारित भाडे भरून वाहकाकडून तिकीट घेणे बंधनकारक असून, विनातिकीट प्रवास हा दंडनीय आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट घेण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.

वाहकांच्या २६२ प्रकरणांतही कारवाई _ Nashik Citylink Ticketless Travel Action

तपासणीदरम्यान वाहकांकडून कर्तव्यात कसूर केल्याची २६२ प्रकरणे समोर आली. यामध्ये प्रवाशांकडून पैसे घेऊनही तिकीट न दिल्याची १२ प्रकरणे, तर पैसे न घेता तिकीटही न दिल्याची २५० प्रकरणे आढळून आली.

या प्रकरणांत संबंधित वाहक एजन्सींवर एकूण ३० हजार ४९३ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

याशिवाय प्रवाशांशी गैरवर्तन करणे, बसथांब्यावर बस न थांबवणे, निर्धारित मार्गात बदल करणे, मद्यप्राशन करून कर्तव्य बजावणे तसेच नियोजित वेळेपूर्वी बस मार्गस्थ करणे अशा प्रकारची १७० प्रकरणे समोर आली. संबंधित प्रकरणांत एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

तक्रारी असल्यास सिटीलिंककडे संपर्काचे आवाहन _ Nashik Citylink Ticketless Travel Action

प्रवाशांनी प्रवासाचे योग्य भाडे भरून वाहकाकडून तिकीट घ्यावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे. प्रत्येक प्रवाशाला तिकीट देण्याची जबाबदारी वाहकाची असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चालक किंवा वाहकांकडून गैरप्रकार अथवा गैरवर्तन झाल्यास प्रवाशांनी सिटीलिंकच्या हेल्पलाइन, मोबाइल अॅप, संकेतस्थळ, ई-मेल किंवा संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik Citylink Ticketless Travel Action

Nashik Pooja Ambekar Murder Case Death Sentence : पूजा आंबेकर खूनप्रकरणी दिराला मरेपर्यंत फाशी; 35 वार करून केली होती हत्या

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Citylink Ticketless Travel Action : विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल”
  1. Finally found a site that actually works smoothly. The login process is super fast and I didn’t encounter any glitches. Definitely a top choice for anyone looking for a reliable experience. Check out youwinlogin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *