Nashik APMC Ganesh Gite Chairmanनाशिक APMC वर नव्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती; गणेश गीते अध्यक्षपदी

Nashik APMC Ganesh Gite Chairman

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कारभारात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बाजार समितीवर आता चार सदस्यीय अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, भाजपचे गणेश बबन गीते यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नव्या अशासकीय प्रशासक मंडळात गणेश बबन गीते यांच्यासह बाळासाहेब महादू सानप, सचिन भास्कर ढिकले आणि बापू विश्वनाथ पिंगळे यांचा समावेश आहे. यामध्ये गणेश गीते अध्यक्ष असून उर्वरित तिघे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

राज्य शासनाच्या प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याच्या धोरणानुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे २१ जुलै २०२६ रोजी विभाजन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या. _ Nashik APMC Ganesh Gite Chairman

विभाजनामुळे यापूर्वीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर तिन्ही बाजार समित्यांचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती.

आता या प्रशासकीय व्यवस्थेत पुन्हा बदल करण्यात आला असून, कार्यरत प्रशासकांच्या जागी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालनालयाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. _ Nashik APMC Ganesh Gite Chairman

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १५(अ) अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिने किंवा बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्या अशासकीय प्रशासक मंडळाकडून बाजार समितीचा कारभार पाहिला जाणार आहे.

नव्या मंडळाच्या नियुक्तीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेकडे शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीशी संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे. _ Nashik APMC Ganesh Gite Chairman

नाशिक बाजार समितीच्या विभाजनानंतर झालेला हा आणखी एक महत्त्वाचा प्रशासकीय बदल मानला जात आहे.

_ Nashik APMC Ganesh Gite Chairman

Nashik Crime News Bangladeshi Citizens Arrested : नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट आधार-पॅनकार्ड जप्त

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik APMC Ganesh Gite Chairman : विभाजनानंतर नाशिक बाजार समितीवर नवे अशासकीय प्रशासक मंडळ; गणेश गीते अध्यक्षपदी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *