Nashik Police Returned Stolen Property
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल केला परत
नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी हस्तगत केलेला तब्बल ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन करण्यात आला. चोरीला गेलेले दागिने, स्त्रीधन, दुचाकी तसेच उदरनिर्वाहासाठी वापरली जाणारी वाहने पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
गुन्ह्यांचा तपास करताना जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करून तो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालकांना शक्य तितक्या लवकर परत करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१ मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कार्यवाही करण्यात आली.
१५ ते ३० सप्टेंबरदरम्यान सात पोलिस ठाण्यांत कार्यवाही _ Nashik Police Returned Stolen Property
१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही प्रक्रिया राबविण्यात आली.
विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबतची आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो संबंधित फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दागिने आणि स्त्रीधन परत मिळाल्याने महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू _ Nashik Police Returned Stolen Property
चोरीला गेलेले स्त्रीधन आणि मौल्यवान दागिने पुन्हा ताब्यात मिळाल्याने अनेक महिला फिर्यादींसाठी हा क्षण भावनिक ठरला. कष्टाने कमावलेली किंवा जपून ठेवलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
त्याचप्रमाणे चोरीला गेलेली दुचाकी तसेच उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने वाहनधारकांनाही मोठा दिलासा मिळाला.
नागरिकांकडून नाशिक पोलिसांचे आभार _ Nashik Police Returned Stolen Property
गुन्हा घडल्यानंतर तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो मूळ मालकाच्या ताब्यात देणे, यामुळे संबंधित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कष्टाने कमावलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याबद्दल अनेक फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले.
मुद्देमाल परत करण्याची ही कार्यवाही यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Police Returned Stolen Property


I’m really liking the updates on this app. It keeps getting better and the user experience is top notch. Go for bdck4444app.