Nashik Voter Registration Special Camp 2026नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर

Nashik Voter Registration Special Camp 2026

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी 3 आणि 4 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष शिबिरांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. नागरिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज या शिबिरांमध्ये स्वीकारले जाणार आहेत. _ Nashik Voter Registration Special Camp 2026

नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना विशेष संधी _ Nashik Voter Registration Special Camp 2026

1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नवमतदारांना, तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना-6 व घोषणापत्र भरून अर्ज करता येईल. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना-8, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. तसेच संबंधित मतदारसंघातील एखाद्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याबाबत नमुना-7 भरून हरकत नोंदविता येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध _ Nashik Voter Registration Special Camp 2026

मतदार नोंदणीसाठी आवश्यक सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. याशिवाय पात्र नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करता येणार आहेत.

विशेषतः 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणारे पात्र युवक तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेले पात्र नागरिक यांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

महादूत जनबिंदू प्रतिनिधी : अय्याज शेख _ Nashik Voter Registration Special Camp 2026

Congress Protest Against CEC Gyanesh Kumar in Nashik : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी; नाशिकमध्ये आंदोलन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

3 thoughts on “Nashik Voter Registration Special Camp 2026 : नाशिक जिल्ह्यात 3 आणि 4 ऑक्टोबरला विशेष शिबिर; मतदार यादीत नाव नोंदणीची संधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *