Pimpri Sayyad Teachers Day Gopalkala Celebration
पिंपरी सैय्यद : शिक्षक दिन आणि गोपालकाला या दोन्ही दिवसांचा योग साधत सिध्द पिंपरी येथील नूतन माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन व गोपालकाला संयुक्तपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिक्षकांनीही ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल भावनिक होत गावाचे व ग्रामस्थांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक बनून अध्यापनाचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची जबाबदारी आणि ज्ञानदानाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. शिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. _ Pimpri Sayyad Teachers Day Gopalkala Celebration
यावेळी शिक्षणतज्ज्ञ श्री. सुरेशभाऊ ढिकले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री. नामदेव ढिकले, भाजप नाशिक तालुकाध्यक्ष तथा पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. रावसाहेब ढिकले, श्री. राजेंद्र राठी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग उपस्थित होता.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेचा अनुभव देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
– प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Pimpri Sayyad Teachers Day Gopalkala Celebration

