Cyber Security Awareness Session Jalgaon
जळगाव : आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत झालेल्या या उपक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर आणि खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता तसेच मजबूत पासवर्ड वापरण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
तसेच 2-Factor Authentication, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व QR कोड स्कॅमपासून बचाव, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी, संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहणे आणि विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही सहभागी व्यक्तींना देण्यात आली.
संवादात्मक आणि प्रभावी पद्धतीने पार पडलेल्या या सत्रात उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्यासोबतच सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प सहभागी व्यक्तींनी केला.
या उपक्रमासाठी आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथील उपस्थितांचे सहकार्य लाभले.
-Cyber Security Awareness Session Jalgaon _


[…] […]
Had a great experience winning big last night! The site is stable and the registration process was very quick. Highly recommend phokbetcom