Sanjay Gandhi Pension Problems Nashikनाशिकमध्ये संजय गांधी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाइन साईट बंद आणि प्रलंबित प्रकरणांमुळे अडचणींचा सामना.

Sanjay Gandhi Pension Problems Nashik

नाशिक : संजय गांधी पेन्शनसाठी लाभार्थ्यांच्या चकरा; ऑनलाइन साईट बंद

नाशिक : तहसील कार्यालय नाशिक ग्रामीण व शहरी अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, जेंडर तसेच गंभीर आजाराशी संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी पेन्शनची ऑनलाइन साईट बंद असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ऑनलाइन प्रणाली तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

पेन्शन मंजुरीसाठी अनेक नागरिक गेल्या चार-पाच महिन्यांपासून, सात-आठ महिन्यांपासून, तर काहीजण एक वर्ष, दीड वर्ष आणि दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत असल्याची तक्रार आहे. पेन्शन प्रकरण मंजूर करण्यासाठी अनेक जाचक अटी आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने गरीब आणि गरजू नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, प्रकरण मंजूर होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागूनही काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

यासोबतच, पैसे दिल्यानंतर प्रकरणे दोन-तीन महिन्यांत मंजूर होतात का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पेन्शन प्रकरणांमध्ये दलाल आणि काही अधिकारी यांच्यात कथित साखळी असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत असून, प्रशासनाने या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय जवळच असतानाही सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे प्रकरण पाठवले जाते, तर दुसरा अधिकारी पुन्हा संबंधित नागरिकाला दुसऱ्या विभागाकडे पाठवतो, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रेशन कार्डच्या कामकाजाबाबतही तक्रारी_ Sanjay Gandhi Pension Problems Nashik

पेन्शनसोबतच रेशन कार्डच्या कामकाजाबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेल्या असतानाही कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्याचे काम दुसरा अधिकारी करत नाही आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याने सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, विधवा तसेच गंभीर आजारांनी त्रस्त लाभार्थ्यांना बसत आहे. पेन्शनच्या कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून अनेक लाभार्थ्यांच्या पायातील चप्पल झिजत आहेत, मात्र त्यांच्या समस्यांकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

पेन्शनच्या पैशावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह_ Sanjay Gandhi Pension Problems Nashik

गरीब आणि गरजू कुटुंबांचा दैनंदिन घरखर्च आणि उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात या पेन्शनच्या पैशावर अवलंबून असतो. त्यामुळे पेन्शनचे अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

DBT प्रक्रिया, आधार कार्ड-बँक खाते लिंक, सहाय्यक पोर्टल अपडेट यांसारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे._ Sanjay Gandhi Pension Problems Nashik

वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विविध आजारांनी त्रस्त असलेले लाभार्थी दिवसभर कार्यालयाबाहेर भुके-प्यासे बसून आपल्या कामाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा प्रवास आणि इतर खर्चासाठी पैसे खर्च करून कार्यालयात गेल्यानंतरही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची व्यथा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

पुढील वेळी कार्यालयात गेल्यानंतर पुन्हा त्याच प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याने लाभार्थी अक्षरशः वैतागले आहेत.

प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी_ Sanjay Gandhi Pension Problems Nashik

संजय गांधी निराधार योजना आणि संबंधित पेन्शन योजनांमधील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, बंद असलेली ऑनलाइन प्रणाली सुरू करावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर मिळवून द्यावे, अशी मागणी गरीब आणि गरजू नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच संबंधित प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे.

प्रतिनिधी : दिपक सरोदे Sanjay Gandhi Pension Problems Nashik

Nashik Road Sumit Pagare Murder Case 12 Suspects Detained : सुमित पगारे हत्याकांडाचा 24 तासांत छडा; 12 संशयित ताब्यात, दोघांचा शोध सुरू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Sanjay Gandhi Pension Problems Nashik : पेन्शनसाठी लाभार्थ्यांच्या तहसील कार्यालयाच्या चकरा; ऑनलाइन साईट बंद, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed