World Tribal Day & Kranti Din Celebration
मनखेड (नाशिक) : अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मनखेड येथे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता करण्यात आली. आश्रमशाळेतील तब्बल ८४७ विद्यार्थिनींनी विविध आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातून भव्य प्रभात फेरी व मिरवणूक काढली. विद्यार्थिनींच्या आकर्षक पारंपरिक वेशभूषेने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ‘जय आदिवासी’च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. शंकर कांमडी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी भगवान बिरसा मुंडा यांची देखणी प्रतिकृतीही उभारण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. नर्मदा भोये होत्या. यावेळी उपसरपंच श्री. जयराम भोये उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कुंवर साहेब, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने आदिवासी पालक उपस्थित होते. (World Tribal Day & Kranti Din Celebration)
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले. शाळेचे प्राचार्य श्री. मणियार सर यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा तसेच जल, जंगल आणि जमीन यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच ९ ऑगस्टच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.
क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथाही विद्यार्थिनींना सांगण्यात आल्या. मनखेड गावातील माजी विद्यार्थी दिगंबर कांमडी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनपटावर सुंदर आणि प्रभावी भाषण केले.
यानंतर विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तारपा नृत्य, लोकगीते आणि आदिवासी गीतांवर सादर करण्यात आलेल्या नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. पारंपरिक कला, संस्कृती आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. (World Tribal Day & Kranti Din Celebration)
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी गेल्या महिनाभरापासून विद्यार्थिनींची विशेष तयारी करून घेतली होती. प्रत्येक विद्यार्थिनीची वेशभूषा, नृत्य तसेच वेगळ्या धाटणीची आदिवासी गीते यांची विशेष तयारी करण्यात आली होती. विद्यार्थिनींनी ही सर्व सादरीकरणे अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली.
शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे तसेच शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. निर्मला भोये यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक संजय पगार, अधीक्षक अरुण पवार, अधीक्षिका मीना चव्हाण, पदवीधर शिक्षक दादाजी खैरनार, सुनिता वाघ, योगेश गोसावी, योगेश पवार, अर्चना जाधव, विनेश भामरे, चेतना पवार, पंकज थोरात, विजय पाटील, निर्मला भोये, वसंत आहेर, तसेच उच्च माध्यमिक शिक्षक दिने सहारे, भास्कर गांगुर्डे, मनसाराम बागुल, प्रवीण चव्हाण आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
– प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल World Tribal Day & Kranti Din Celebration


[…] […]
Love the layout and the way the promotions are set up. It feels like they actually care about the players. Cheers to phjilijili for the awesome experience.
I have been trying out different betting platforms for a while and this one really stands out. The interface is super clean and my bets go through instantly. Customer support actually answers fast too. Highly recommend giving it a shot if you want a smooth experience. appcloudbet