Chandwad Taluka School Wrestling Competitionचांदवड येथील जीवन कुस्ती संकुलात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

Chandwad Taluka School Wrestling Competition

चांदवड : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक, चांदवड तालुका क्रीडा समिती आणि महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिनाथ नगर येथील जीवन कुस्ती संकुलात १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. ग्रीको-रोमन आणि फ्री-स्टाईल या दोन्ही प्रकारांतील सामने खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे रंगतदार ठरले.

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर ठाकरे होते. तर उद्घाटक म्हणून प्रभागाचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी अनिल कोतवाल उपस्थित होते. (Chandwad Taluka School Wrestling Competition)

यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल कोतवाल यांनी कुस्ती हा भारताच्या गौरवशाली क्रीडा परंपरेशी जोडलेला खेळ असल्याचे सांगितले. तसेच ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारा खेळ म्हणून कुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर मोठे यश संपादन करावे, असे आवाहन करत त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना प्रेरित केले.

यावेळी त्यांनी जीवन कुस्ती संकुलाचे संचालक प्रा. जीवन शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना घडविण्यासाठी प्रा. जीवन शिंदे यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड पोलीस स्टेशनचे अमोल जाधव, आजगे दादा, शिवाजी बाबा गवळी, ज्ञानेश्वर हिरे, क्रीडा शिक्षक दत्ता ठाकरे, संजय गांगुर्डे, शामराव पगार, विश्वास मुरकुटे, राहुल देवरे आणि अनिकेत निंबाळकर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विविध शाळांतील क्रीडा शिक्षक-शिक्षिकांनीही स्पर्धेला उपस्थिती लावली.

या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चांदवड तालुक्यातील एकूण ५४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. नेमिनाथ जैन विद्यालय, महाराणी उषाराजे होळकर विद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी, जनता विद्यालय देवरगाव, पी. डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालय, उसवाड विद्यालय या शैक्षणिक संस्थांमधील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

निवड झालेले खेळाडू देवळाली कॅम्प येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चांदवड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेचे आयोजन प्रा. जीवन शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजनातून केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चांदवड तालुका क्रीडा स्पर्धा प्रमुख निरंजन गायकवाड यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. तसेच कुस्ती स्पर्धेतील नियमांची माहिती देत सर्व सहभागी खेळाडूंना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, खेळाडूवृत्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

– प्रतिनिधी : संजय जाधव Chandwad Taluka School Wrestling Competition

APK File Online Fraud Nashik : फाईल डाऊनलोड करताच नाशिकच्या व्यावसायिकाची 1.69 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Chandwad Taluka School Wrestling Competition : चांदवड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed