Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Caseविनयभंगाच्या कथित प्रकरणानंतर ४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; पत्नीच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.

Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Case

नाशिक : सातपूर परिसरातील एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव गणेश भिका गायकवाड (वय ४०, रा. श्रमिकनगर, सातपूर) असे असून, त्यांच्या पत्नी शीतल गणेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुकुमार जेना, मानवी जेना आणि प्रशांत कोकंदे (सर्व रा. जीवनगंगा सोसायटी, श्रमिकनगर, सातपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, संशयितांनी गणेश गायकवाड यांच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटी, समाज आणि नातेवाईकांमध्ये त्यांची बदनामी झाली. या घटनेमुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्यातूनच त्यांनी १६ जुलै रोजी उपनगर परिसरातील डीजीपीनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

असे होते मूळ प्रकरण

सातपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, गायकवाड यांच्या घराशेजारी राहणाऱ्या फिर्यादीच्या पीडित मैत्रिणीने गायकवाड यांच्या मुलीकडे मोबाईल मागितला होता. त्यावेळी गणेश गायकवाड यांनी पीडितेशी अश्लील संभाषण करून तिची लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार १० जुलै रोजी सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या तक्रारीच्या आधारे सातपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

टीप : या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, विनयभंगाच्या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. संबंधित आरोपांची सत्यता पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे

Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Case

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात; 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Crime Ganesh Gaikwad Suicide Case : विनयभंगाच्या कथित प्रकरणानंतर 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *