NIPUN Bharat Video Review by CEO Karishma Nairनिपुण भारत अभियानांतर्गत डोंगर कठोरे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत सीईओ करिश्मा नायर यांनी अध्ययन गुणवत्तेचा आढावा घेतला.

NIPUN Bharat Video Review by CEO Karishma Nair

जळगाव | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवारी निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा, डोंगर कठोरे येथील वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययन स्तराची पडताळणी करत शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचेही त्यांनी कौतुक केले.

या संवादादरम्यान शिक्षक राहुल वाणी यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन स्तरानुसार विविध प्रश्न विचारण्यात आले. वाचन, गणित, आकलन क्षमता तसेच त्या दिवसाच्या कृती आराखड्यानुसार वर्गात झालेले अध्यापन याबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली.

स्तर ५ मधील विद्यार्थ्यांकडून २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेण्यात आले. त्यानंतर फळ्यावर बिनहातच्याची बेरीज करून विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याची चाचणी घेण्यात आली. तसेच प्रगत स्तरातील एका विद्यार्थिनीने १०० पर्यंतच्या दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज अचूक सोडविल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी तिचे विशेष कौतुक केले.

यावेळी स्तर ५ मधील एका विद्यार्थिनीचे वाचन ऐकून आवश्यक सुधारणा करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर प्रगत गटातील विद्यार्थिनीने जोडाक्षरयुक्त शब्द व वाक्यांचे प्रभावी आणि अचूक वाचन करून दाखवल्याने तिचे अभिनंदन करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करिश्मा नायर यांनी केले.

व्हिडिओ संवादाच्या शेवटी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, शिक्षकांचे नियोजन आणि निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्या.

NIPUN Bharat Video Review by CEO Karishma Nair

 खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन; सभामंडपासाठी डीपीडीसीतून निधी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *