Kharde Shri Vitthal Rukmini Temple Bhoomipujan
धरणगाव | प्रतिनिधी – सुरेश पाटील
धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गावात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर नसल्याची बाब वारकरी मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सरपंच यांनी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंदिराच्या सभामंडपाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी)च्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या घोषणेमुळे गावातील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, सरपंच कैलास पाटील, उपसरपंच योगेश पाटील, ह.भ.प. विकास महाराज, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, उमेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील, मंगलाबाई बाविस्कर, प्रियंका कोळी, देविदास पाटील, विशाल पवार, माजी तालुकाप्रमुख गजानन पाटील, हायस्कूलचे चेअरमन वसंतराव भोलाणे, माजी सभापती दीपक सोनवणे यांच्यासह वारकरी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, याच दौऱ्यात जय गुरुदेव माध्यमिक विद्यालय, खर्दे येथे वृक्षारोपण कार्यक्रमही उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. धार्मिक कार्यासोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
Kharde Shri Vitthal Rukmini Temple Bhoomipujan
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ४१ वी SET परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा


[…] खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदि… […]
[…] खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदि… […]