CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumarदेवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याविरोधात बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला.

CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar

नाशिक | प्रतिनिधी : दीपक सरोदे

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तसेच २०१२ बॅचचे आयडीईएस (IDES) अधिकारी अजय कुमार यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बेहिशेबी संपत्ती प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल ५ कोटी ७२ लाख ७९ हजार रुपयांची संशयास्पद मालमत्ता जमा केल्याचा आरोप ठेवत सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या कारवाईमुळे नाशिकसह प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारी सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अजय कुमार यांच्याकडे केवळ ५२ हजार ४२८ रुपयांची मालमत्ता होती. मात्र पुढील दहा वर्षांत त्यांच्या मालमत्तेत झालेली झपाट्याने वाढ पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेली. अधिकृत उत्पन्नाशी या संपत्तीचा मेळ लागत नसल्याने सीबीआयने सखोल चौकशी सुरू केली.

१० वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास

सीबीआयने १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीतील अजय कुमार यांच्या उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेचा बारकाईने अभ्यास केला. तपासाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ ५२ हजार ४२८ रुपये इतकी मालमत्ता असल्याचे दिसून आले. मात्र तपास संपेपर्यंत हा आकडा ५ कोटी ५९ लाख ६७ हजार रुपयांपर्यंत पोहोचला.

या कालावधीत त्यांनी ५ कोटी १७ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाचा विचार करता या कालावधीत १३ लाख ६४ हजार रुपयांचीच बचत अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त मालमत्ता आढळून आली. या मालमत्तेचा कायदेशीर स्रोत स्पष्ट करण्यात ते अपयशी ठरल्याचे सीबीआयच्या तपासात नमूद करण्यात आले आहे.

पत्नी आणि आईलाही सहआरोपी

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. भ्रष्ट मार्गाने मिळालेला पैसा लपवणे, त्याची गुंतवणूक करणे आणि विविध माध्यमांतून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अजय कुमार यांना त्यांच्या कुटुंबीयांची मदत मिळाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

या प्रकरणात त्यांची पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनी आर्थिक व्यवहारांमध्ये सहकार्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने सीबीआयने दोघींनाही या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून समाविष्ट केले आहे. याशिवाय, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनीही या व्यवहारांमध्ये मदत केल्याची माहिती तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

पुढील तपास अधिक तीव्र

अजय कुमार यांच्याकडे आढळलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा उगम, विविध आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीचे स्रोत आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत सीबीआयकडून पुढील तपास अधिक वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar

चांदवड : दिघवद शिवारात कारमधून ३२ किलो गांजा जप्त; सिन्नरच्या तिघांना अटक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “CBI Action Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar : नाशिकच्या माजी कॅन्टोन्मेंट सीईओकडे बेहिशेबी 5.72 कोटींची संपत्ती; सीबीआयचा मोठा गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed