Malegaon 3 year old girl murderमालेगाव तालुक्यात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी विजय खैरनार अटक. नागरिकांचा एकच आवाज — फाशी द्या!

Malegaon 3 year old girl murder

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी, अत्यंत हृदयद्रावक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीवर प्रथम लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीचा मृतदेह मालेगाव सामान्य रुग्णालयात आणताच नातेवाईकांसह गावकरी, महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. आक्रोश, रडवेल्या आणि रोषाने भरलेले वातावरण पाहायला मिळाले. सर्वांनी एकच मागणी केली — “या आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या!”

घटनास्थळाची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाले. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी विजय खैरनार (वय — अंदाजे 25 ते 30) या संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये आरोपीवर गंभीर आरोपांची पुष्टी झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Malegaon 3 year old girl murder)

डोंगराळे गाव हादरून गेलं आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपींवर कडकात कडक कारवाई व्हावी आणि भविष्यात कोणत्याही बालकावर असा अत्याचार होऊ नये यासाठी विशेष कायदेशीर पावले उचलावीत. (Malegaon 3 year old girl murder)

ही घटना केवळ एका कुटुंबावरचे दुःख नाही, तर संपूर्ण समाजाला जाग करणारी वेदनादायी धक्कादायक घटना आहे.
चिमुकली यज्ञा — या देवदूताला न्याय मिळाला पाहिजे!

MHDU News : Priya Borse Malegaon 3 year old girl murder

भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

5 thoughts on “Malegaon 3 year old girl murder : मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *