Bhosala Military School Leopard Nashikनाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्याची एन्ट्री! वन विभागाची तातडीने शोधमोहीम; विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर.

Bhosala Military School Leopard Nashik

नाशिक : गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी कॅम्पसमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बिबट्याचे पिल्लू दिसल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. (Bhosala Military School Leopard Nashik)

घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने ताबडतोब वन विभागाला याबाबत कळवले. काही मिनिटांतच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर Rescue टीमही शाळेत पोहोचून तपास व शोधमोहीम हाती घेतली.

दरम्यान खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला सुट्टी जाहीर केली असून, पालकांना आपल्या मुलांना सुरक्षितरित्या घरी घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Bhosala Military School Leopard Nashik)

मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याच्या वावराच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच महात्मा नगर परिसरात बिबट्या शिरल्याची नोंद झाली होती. त्यामुळे ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

वन विभागाचे पथक सध्या परिसरात शोधमोहीम राबवत असून, बिबट्याच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी ड्रोन, कॅमेरा ट्रॅप व तज्ज्ञांच्या मदतीचा वापर करून तपास सुरू आहे. (Bhosala Military School Leopard Nashik)

MHDU News : Vishal Bhadane

नाशिक पालिका निवडणूक: अंतिम क्षणी अर्जांचा महापूर; एका दिवसात 18 नगराध्यक्ष आणि 324 सदस्यपदाचे अर्ज

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

3 thoughts on “Bhosala Military School Leopard Nashik : धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण”
  1. Just downloading the app from 88betapps and it seems to work smoothly, but haven’t fully looked into it as of yet. This helps if you want a mobile option for 88bet. If you want to use it, check it out 88betapps.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed