Saptashrungi Gad FDA Inspection Action
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असताना अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या १३ अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, १८ अन्न नमुने विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले आहेत.
१,४०८ किलो मिठाईचा साठा नष्ट _ Saptashrungi Gad FDA Inspection Action
तपासणीदरम्यान पामतेलयुक्त माव्यासदृश्य मिठाईची असुरक्षित वातावरणात वाहतूक व साठवणूक केली जात असल्याचे आढळले. तसेच या खाद्यपदार्थांवर नियमानुसार आवश्यक असलेली लेबलविषयक माहिती नसल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर जनआरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने १ हजार ४०८.७ किलो मिठाईचा साठा नष्ट केला. या साठ्याची एकूण किंमत ५ लाख ६२ हजार ९० रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी _ Saptashrungi Gad FDA Inspection Action
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गडावर येतात. या काळात पेढे, मिठाई, प्रसाद आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि हाताळणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली.
मिठाई विक्रेत्यांना मार्गदर्शन _ Saptashrungi Gad FDA Inspection Action
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पेढा विक्रेत्यांना आवश्यक परवाने व नोंदणी, स्वच्छता, खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक आणि हाताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी, नमुना सहाय्यक तसेच सप्तशृंगी ग्रामपंचायत, देवी संस्थान आणि रोपवेच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहकार्य केले.
भाविकांच्या आरोग्याला प्राधान्य _ Saptashrungi Gad FDA Inspection Action
धार्मिक स्थळांवर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि लागू नियमांचे पालन करावे, तसेच आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
_ Saptashrungi Gad FDA Inspection Action


This place has a great vibe and the payouts are consistently fast. I appreciate the transparency and the easy registration process. phbtbjili