Palse Nashik Leopard News
नाशिक : पळसे, ता. जि. नाशिक येथील पुण्यनगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवस आणि रात्री बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी दिवसा उजेडात बिबट्या शेतात नागरिकांना दिसून आला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास टोमॅटोच्या शेतातील सरीमध्ये बिबट्या बसलेला आढळून आला. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कडवा कॅनॉलच्या पाटावरही बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्याने दिलीप विष्णू गायधनी यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून परिसरातील पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत असल्याने लहान मुले, महिला आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे तसेच पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्व. अजित दादा पवार सामाजिक संस्थेचे सचिव बाळासाहेब गायधनी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Palse Nashik Leopard News


I’ve been playing here for a few weeks now and the interface is super smooth. Definitely one of the best experiences I’ve had lately. Check out vnwe88 for more.
The game variety here is just insane. I spent the whole weekend exploring different slots and hit a decent streak. Highly recommend it to my buddies. Visit wolf7777 and see for yourself.