Nashik Ring Road Farmers Meeting Done With CMनाशिक रिंगरोड आणि हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक; मखमलाबाद-गोवर्धन अलायमेंटचे आठ दिवसांत फेरसर्वेक्षण आणि १५ दिवसांत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश.

Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

नाशिक, दि. ३ ऑक्टोबर २०२६ : नाशिक रिंगरोड तसेच हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. पालकमंत्री गिरीश महाजन आणि छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत सुमारे दीड तास चर्चा झाली.

बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, मखमलाबाद ते गोवर्धन या रिंगरोड अलायमेंटचे पुढील आठ दिवसांत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

फेरसर्वेक्षण करताना शेतकऱ्यांची घरे, विहिरी, बोअरवेल तसेच शेतीचे कमीत कमी नुकसान होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या गवळवाडीमार्गे पर्यायी अलायमेंटचाही तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यास विचार करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.

मोबदल्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्देश _ Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

गोवर्धन, जलालपूर, महादेवपूर, बेळगाव ढगा, राजूर बहुला आदी ग्रामीण भागातील बाधित शेतकऱ्यांसाठी गुणांक दोन, तर शहरी भागासाठी गुणांक एक या तरतुदीनुसार कायदेशीर प्रक्रिया करून योग्य मोबदला निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिरायती आणि बागायती जमिनींचे वर्गीकरण करताना प्रत्यक्ष शेतजमिनीची पाहणी, विहिरी, बोअरवेल आणि पिकांची स्थिती तपासावी, तसेच बागायती जमिनीला नियमानुसार योग्य मोबदला मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

तसेच प्रत्येक गावातील ५०० मीटरच्या परिसरातील मागील तीन वर्षांतील उच्चतम खरेदी व्यवहारांचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला निश्चित करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही निर्देश _ Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन आणि रस्त्याच्या आखणीतील विविध त्रुटी बैठकीत निदर्शनास आणून दिल्या. साडेतीन मीटर जागेचे अधिग्रहण झालेले असतानाही रस्त्याच्या आखणीत काही त्रुटी राहिल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणातील कायदेशीर बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तपासून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

प्रत्यक्षात ज्या अतिरिक्त जागेचे भूसंपादन आवश्यक आहे, त्या जागेचा मोबदला लागू असलेल्या भूसंपादन कायद्यानुसार योग्य पद्धतीने देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

१५ दिवसांत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश _ Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

शेतकरी शिष्टमंडळाने मांडलेले प्रलंबित प्रश्न संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने पुढील १५ दिवसांत सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये किंवा त्यांना कमी मोबदला मिळू नये, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शासनाने सुमारे ३,६०० कोटी रुपयांची तरतूद केली असून निधीची आवश्यकता भासल्यास त्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीनंतर शेतकरी शिष्टमंडळाने आजच्या निर्णयांमुळे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा लढा मोठ्या प्रमाणात पुढे सरकल्याची भावना व्यक्त केली. उर्वरित मागण्या पुढील १५ दिवसांत मार्गी लागण्याची अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास रिंगरोडच्या कामाला शेतकरी सहकार्य करतील, असे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि संबंधित मंत्र्यांना रिंगरोडच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित करून कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासनही देण्यात आले. _ Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

बैठकीस उपस्थित अधिकारी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल सचिव विकास खर्गे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, एमएसआयडीसीचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नाशिक उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, एमएसआरडीसी अधिकारी रणजीत हांडे तसेच संबंधित भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी शिष्टमंडळ: करण गायकर, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, अक्षय काकड, पंकज खताळे, सागर लोणे, विश्वास नागरे, रवी पेखळे, भाऊसाहेब भावले, विनायक ढेमसे, अनिल नवले, संदीप रिकामे, तानाजी जाधव, रोशन उगले, शिवाजी डांगले, मधुकर पोरजे आणि अविनाश पोरजे यांच्यासह रिंगरोड व हायवे क्रमांक २९ बाधित शेतकरी उपस्थित होते.

_ Nashik Ring Road Farmers Meeting Done With CM

Rohit Sharma Breaks Sachin Tendulkar ODI Record : रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा २२ वर्षे जुना विक्रम; सलामीवीर म्हणून १० हजार वनडे धावा सर्वात जलद

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *