Nashik NMC Recruitment Politics
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने अनेक वर्षांनंतर अभियंता तसेच अग्निशमन विभागातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या सरळसेवा भरतीत एकूण ३०० पदांचा समावेश असून, त्यात अभियंता गट ‘क’ मधील ११४ पदे आणि अग्निशमन संवर्गातील चालक व फायरमन अशी १८६ पदांचा समावेश आहे.
तथापि, या भरती प्रक्रियेत नमूद केलेल्या काही अटींवरून आता राजकारण पेटले आहे. ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून काही अटी अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे आणि भरती तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, या अटींमुळे काही पात्र उमेदवारांना अन्याय सहन करावा लागणार असून, या मागे ‘मोठे षड्यंत्र’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Nashik NMC Recruitment Politics)
राजाभाऊ वाजे म्हणाले की, “राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, संभाजीनगर, अहिल्यानगर या महानगरपालिकांमध्ये झालेल्या भरतींमध्ये अशा प्रकारच्या अटी नव्हत्या. मग नाशिकमध्येच या अटी का ठेवण्यात आल्या? मनपेत ‘टेंडर मॅनेजमेंट’ चालते, आता ‘भरती मॅनेजमेंट’ सुरू आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “मनपाला मिळणारे उत्पन्न स्थानिक नागरिकांच्या करातून मिळते, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारात संधी देणे हे न्याय्य आणि आवश्यक आहे.” फरांदे यांनी इशारा दिला की, जर स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाला, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. (Nashik NMC Recruitment Politics)
भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळावा, अशी मागणी दोन्ही नेत्यांकडून होत असून, आगामी काळात या मुद्द्यावरून नाशिकमधील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
MHDU News : Vishal Bhadane Nashik NMC Recruitment Politics

नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा राहुल ढिकलेंकडे; ‘100 प्लस’चे भाजपचे लक्ष्य!


[…] नाशिक मनपा भरतीवरून राजकारण तापले; खा.… […]
[…] नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (मंगळवार) प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते पारदर्शक ड्रममधून चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. […]
Alright peeps, 69vnvvip caught my attention. Checking it out now. See for yourself if you like 69vnvvip.
Placed a few bets on 88859bet. Odds seem competitive, and the platform is easy to navigate. Will continue to use it for my sports betting. Good and reliable 88859bet!