Nashik farmers crop shift
नाशिक (MHDU News): शेतीचा वाढता खर्च, बाजारभावातील अस्थिरता आणि मजुरांची टंचाई यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत मोठा बदल केला आहे. पारंपरिकरित्या ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि फुलशेतीसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा आता कांदा, मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात आघाडी घेत आहे.
बाजरी, ज्वारी, उडीद, मूग यांसारख्या पारंपरिक कडधान्यांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्याची शेती आता नगदी पिकांकडे वळली असून, हे परिवर्तन कृषी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे संकेत देत आहे. (Nashik farmers crop shift)
१६ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक अन्न दिनानिमित्त जिल्ह्यातील बदलत्या शेतीच्या चित्राकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या अतिपर्जन्यमान असलेल्या भागांत भातशेती केली जाते, तर निफाड, दिंडोरी, कळवण, देवळा आणि बागलाण तालुक्यांमध्ये द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी आणि भाजीपाला फळबागा बहरात आहेत. दुसरीकडे, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर आणि चांदवड या भागांत मका, सोयाबीन आणि कडधान्यांचे प्रमुख उत्पादन घेतले जाते.
नाशिक जिल्ह्यात सुमारे ६.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके, १.११ लाख हेक्टरवर रब्बी पिके, तसेच १.१८ लाख हेक्टरवर फळबागा आणि भाजीपाला घेतला जातो. फुलशेती, स्ट्रॉबेरी, आणि रेशीम शेती यासारखे पूरक व्यवसायदेखील शेतकऱ्यांना नफा टिकवून ठेवण्यासाठी मदत करत आहेत.
मजुरांची टंचाई – शेतीसमोरील मोठे आव्हान (Nashik farmers crop shift)
ग्रामीण भागातील मजुरांच्या काम करण्याच्या प्रवृत्तीत झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना कुशल मजूर मिळणे कठीण झाले आहे. महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत मिळाल्याने मजुरीकडे ओढा कमी झाला आहे. परिणामी मजुरी दर वाढले असून शेतीचा खर्च अधिक वाढला आहे.
आज ग्रामीण मजूर शिक्षणाकडे वळत आहेत, परंतु त्यांच्या पुढील पिढ्या पारंपरिक शेतीकामात रस दाखवत नाहीत. या परिस्थितीत उत्पादन खर्च वाढत आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
शेतीतील नफा टिकवण्यासाठी आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी नाशिकचे शेतकरी पीकपद्धतीत परिवर्तन करत आहेत. मात्र, मजुरांचा तुटवडा, खर्च आणि हवामानातील अनिश्चितता यावर उपाय न झाल्यास शेतकऱ्यांचा संघर्ष पुढेही सुरू राहणार आहे.
MHDU News : Vishal Bhdane Nashik farmers crop shift


Saw 7700bet777 advertised somewhere. Gave it a quick look. Pretty much what you’d expect. Worth a shot if you’re bored. Head over to 7700bet777.